जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात (चालूबाकी दार) अशा शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त रू.50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देणार.
ज्या शेतकऱ्यांची कर्ज व व्याजाची रक्कम रू.२ लाखांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ.
ज्या शेतकऱ्यांची कर्ज व व्याजाची रक्कम रु. २ लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार परंतु २ लाख रुपयाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांना भरावीच लागणार (ओटीएस)
महात्मा जोतीबा फुले कर्ज मुक्ती योजना १५ हजार शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली
राज्य सरकारने अर्थ संकल्पा पूर्वी सोमवारी दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी कर्ज माफी लाभार्त्याची पहिली यादी website वर प्रकाशित केली ह्या याद्या फक्त CSC सेंटर चालक, बँक आणि तहसील व तलाठी यांना बघता येणार आहेत व त्यांनी या याद्या नोटीस बोर्ड वर प्रिंट करून लावायच्या आहेत.
या यादीमध्ये शेतकरी आपले नाव शोधून त्यावरील १ विशिष्ट क्रमांक घेऊन त्यासोबत आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बँकेत किवा CSC सेंटर मध्ये जायचे आहे आणि बायोम्याट्रिक किवा OTP द्वारे सर्व माहीती verify करायची आहे त्यानंतर शेतकरी याचे काम संपले.
या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर कर्ज माफी हि झालेली आहे .
३४ लाख शेतकरी आजून हि प्रतीक्षेत.
१५ हजार शेतकर्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला पण ३४ लाख शेतकरी या योजने मध्ये बसतात त्यांचं काय आसा विचारणा शेतकरी वर्ग करत आहे त्यावर सरकारने २८ फेब्रुवारीला दुसरी यादी येणार आणि ३० मार्च च्या अगोदर पूर्ण कर्ज माफी होणार आसे आश्वासन देण्यात आले आहे.